संतापजनक : परभणीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेने केली आत्महत्या, 2 आरोपींना अटक

Parbhani 16 years old girl gang raped commits suicide 2 accused arrested

Parbhani 16 years old girl gang raped  : राज्यात एकापाठोपाठ महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुंबई-पुण्यातील तसेच विदर्भातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता परभणीतून संतापजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Parbhani 16 years old girl gang raped commits suicide 2 accused arrested


विशेष प्रतिनिधी

परभणी : राज्यात एकापाठोपाठ महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुंबई-पुण्यातील तसेच विदर्भातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता परभणीतून संतापजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात राहणाऱ्या पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पीडितेचे वय 16 वर्षे होते. हे तिन्ही आरोपी पीडितेला मागच्या दोन वर्षांपासून त्रास देत होते. 12 सप्टेंबर रोजी संधी साधून या तिन्ही नराधमांनी पीडित मुलीला दिघोळ तांडा परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू

या घटनेनंतर पीडितेने विष प्राशन केले. तिला अंबाजोगाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी पीडितेला लातूरच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. पीडितेचा लातूर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेतील दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर 19 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 376-डी, 354-डी, 34 सह आयपीसीच्या 3,6,8,17 आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर पीडितेने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि तिन्ही आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे, राज्यात अत्याचार थांबण्याचे नाव नाही

आठवड्यापूर्वी मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घालण्यात आला. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, एका आठवड्यात राज्यात अशा बलात्काराच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यांनी प्रश्न विचारला होता की, अशा नराधमांमधून कायद्याची भीती का नाहीशी होत आहे? बलात्काराच्या घटनांमध्ये अचानक का वाढ झाली आहे? महाराष्ट्र महिलांसाठी इतका असुरक्षित का होत आहे? हेच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. यावरून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे.

Parbhani 16 years old girl gang raped commits suicide 2 accused arrested

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण