नोकरशाही काहीही लायकी नाही, अधिकारी उचलतात नेत्यांच्या चपला – उमा भारतींच्या वक्तव्यामुळे वादंग


वृत्तसंस्था

भोपाळ : नोकरशाहीतील अधिकाऱ्यांची काहीही लायकी नाही. ते आमच्या चपला उचलण्यासाठीच ते आजूबाजूला असतात, असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केले. तसा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. Uma Bhartais controversial remarks

भेटायला आलेल्या एका शिष्टमंडळापुढे त्या म्हणाल्या की, नोकरशाहीचे राजकारण्यांवर नियंत्रण असते असे तुम्हाला वाटते का. ही सगळी चर्चा मूर्खपणाची आहे. प्रारंभी खासगी पातळीवर चर्चा होते. मग अधिकाऱ्यांकडून फाइल तयार केली जाते आणि आम्हाला ती दिली जाते. मला विचारा तुम्ही, कारण मी ११ वर्षे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.अधिकारी आमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांची पात्रता तरी काय? आम्ही त्यांना पगार देतो. आम्ही त्यांना पदे देतो. आम्ही त्यांना बढती देतो. आम्ही त्यांना पदावनतीही देतो. ते काय करू शकतात ? सत्य हे आहे की आम्ही त्यांचा राजकारणासाठी वापर करतो.

Uma Bhartais controversial remarks

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण