शेतकऱ्यांच्या समस्यांचे मतांसाठी राजकारण केल्यास देशात विभाजन – उपराष्ट्रपती नायडूंचा इशारा


वृत्तसंस्था

गुरुग्राम : शेतकऱ्यांच्या समस्यांचे मतांसाठी राजकारण केले जाऊ नये. त्यामुळे देशात विभाजन होईल, असा इशारा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. Don’t get politics in to farmers issues

ते म्हणाले की, राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. संपूर्ण देशात एकच बाजारपेठ का असू शकत नाही. आंध्र प्रदेशचा तांदूळ तमिळनाडूत विकला जाऊ शकत नाही हे हास्यास्पद आहे.



संपूर्ण देश एकेरी अन्न विभाग असला पाहिजे आणि त्यावर कोणतीही बंधने असू नयेत. हे फार महत्त्वाचे आणि केवळ शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे.
शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इतर सर्व क्षेत्रांत अर्थव्यवस्था खालावली असताना कृषी उत्पादन गेली सलग दोन वर्षे वाढले आहे. शेतीचे आधुनिकीकरण होणे फार महत्त्वाचे आहे. शेती शाश्वत आणि किफायतशीर ठरावी म्हणून सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा, असेही नायडू नमूद केले.

Don’t get politics in to farmers issues

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात