अनुभवींना बाहेरचा रस्ता; आक्रस्ताळ्यांना स्वागताच्या पायघड्या; राहुल काँग्रेसचे नवे धोरण; कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अनुभवी नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आणि वादग्रस्त आक्रस्ताळा नेत्यांना स्वागताच्या पायघड्या घालायच्या असे नवे धोरण काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अवलंबिले आहे. याचे उदाहरण पंजाब आणि गुजरातमध्ये दिसत आहे. Kanhaiya Kumar, Gujarat MLA Jignesh Mevani To Join Congress: Sources

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखा अनुभवी मोहऱ्याला राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदावरून घालविले. आता ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. कन्हैया कुमार सध्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर नेता आहे. तो आपल्या बरोबर काही तरुण कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन येणार आहे. जिग्नेश मेवाणी याला गुजरात प्रदेश काँग्रेसचा कार्याध्यक्ष करण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले.गुजरात मध्ये 2022 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. त्यावेळी जिग्नेश मेवाणी काँग्रेसला मते खेचण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असा राहुल गांधींचा होरा आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात असे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे दोन प्रतिभावंत नेते असल्याचे राहुल गांधी यांचे मत आहे. त्यांच्या रूपाने आपण काँग्रेसला तरुण नेतृत्व बहाल करत आहोत, असा राहुल गांधी यांचा समाज आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही विद्यार्थी नेते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संबंधित आहेत आणि भारत तेरे तुकडे होंगे हजार अशा घोषणांच्या वेळी तेथे हजर होते. त्यांच्यावर विविध न्यायालयांमध्ये देशद्रोहाचे खटले सुरू आहेत.

Kanhaiya Kumar, Gujarat MLA Jignesh Mevani To Join Congress: Sources

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण