आसाम – केरळात साम्य काय??; जिहादी तालिबान्यांचे रुजलेत खोलवर पाय…!!


वृत्तसंस्था

गुवाहाटी / तिरुवनंतपुरम : सुदूर पूर्वेच्या आसाम आणि दक्षिणेच्या केरळ या राज्यांमध्ये नेमके साम्य काय आहे…?? तर जिहादी आणि तालिबान्यांचे पाय खोलवर रुजले आहेत आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे हे ते साम्य आहे…!! याविषयीचे गंभीर इशारे दुसऱ्या दुसऱ्या कोणी नसून आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि केरळमध्ये माजी केंद्रीय मंत्री अल्फान्सो यांनी दिले आहेत. Assam and kerala most hit by Jihadi and Talibani elements

आसामच्या चहा मळ्यांच्या भागात जिहादी मोठ्या प्रमाणावर घुसले आहेत. तेथे स्थानिक हिंदूंचे जिणे हराम करत आहेत. धर्मांतराची लाट मोठ्या प्रमाणावर आहे/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सरकारला जिहादी कारवाया रोखण्यासाठी मदत करावी, असे थेट आवाहन मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे. सिल्चर मधील संघाचे मुख्यालय केशव निकेतनमध्ये ते बोलत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला हा गंभीर धोका, आसाम – बांगलादेश बॉर्डर वरचे जिल्हे जिहादी कारवायांनी कसे त्रस्त आहेत याचेच वर्णन करतो आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार आल्यापासून निदान याकडे लक्ष तरी वेधले जात आहे, अन्यथा आधीच्या सरकारांमध्ये जिहादी कारवायांना कारवायांवर पांघरूण घातले जात होते आणि छुपे प्रोत्साहनही दिले जात होते.



जे आसामचे तेच केरळचे…!! केरळमध्ये लव जिहाद, नार्कोटिक्स जिहाद पसरल्याचे बिशप जोसेफ यांनी म्हणताच मोठा गदारोळ उठला. पण केरळमधील माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार अल्फान्सो यांनी देखील याच प्रकारचे वक्तव्य केले आहे. विशिष्ट भागांमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तालिबानीकरण झाले आहे की येत्या पाच-दहा वर्षात केरळ अफगाणिस्तान बनल्याशिवाय राहणार नाही, असा अत्यंत गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

केरळ विविध दहशतवादी संघटनांच्या “रिक्रुटमेंटचे हब” बनले आहे हा इशारा तर तिथल्या पोलीस प्रमुखांनी देखील दिला आहे. डाव्या पक्षांचे सरकार आणि काँग्रेसचे सरकार या दोन्ही सरकारांनी या रिक्रूटमेंटकडे एकदाच दुर्लक्ष केले किंवा त्यांच्या स्थानिक नेत्यांनी या रिक्रुटमेंटला प्रोत्साहनही दिल्याचे आढळून आले आहे. लव, जिहाद नार्कोटिक्स जिहाद आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनामध्ये रिक्रूटमेंट या एकाच वेळी गोष्टी सुरू असल्याचे अल्फान्सो म्हणालेत. त्याच वेळी केरळचे सरकार ह्या गंभीर कारवायांवर पांघरूण घालण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंचे संमेलन भरवण्याचा सारखी राजकीय मशक्कत करून घेते. यातून त्या सरकारला दहशतवादी आणि जिहादी कारवायांचे गांभीर्य नाही हेच स्पष्ट होते आरोप अल्फान्सो यांनी लावला आहे.

Assam and kerala most hit by Jihadi and Talibani elements

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात