शिवसेनेचे नेते खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची वारंवार का आठवण काढताहेत…??


राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला दगाफटका करणार याची शिवसैनिकांना मनातून खात्री वाटायला लागली आहे आणि यातूनच संजय राऊत, अनंत गीते यांच्यासारखे नेते अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही भाषांमध्ये पवारांना खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची आठवण करून देत आहेत. वास्तविक हा पवारांना इशारा आहे. ते जर “तसे” करणार असतील तर शिवसैनिकही त्यांचे जुने “खंजिरी राजकारण” उपसून काढतील, असे मानायला वाव आहे…!!Shiv sena leaders pinched sharad pawar over his back stabbing politics in Maharashtra


अनुकूल असो अथवा प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सातत्याने महाराष्ट्रातल्या “खंजिरी राजकारणाची” आठवण करून देत आहेत. यामागे त्यांचा काय हेतू आहे…?? खरंच काही महाराष्ट्रात खंजीर खुपसण्याचे राजकारण घडते आहे काय…?? अशी शंका पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडने भाजपशी आघाडी करण्याचा विचार करावा, अशी सूचना केल्यानंतर शिवसैनिकांना येणे स्वाभाविक आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुचनेमागे शरद पवार यांचाच काही डाव तर नाही ना…!! अशी ही शंका आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे पाहिले पाहिजे.

मराठीत एक म्हण आहे, “खुंटा हलवून बळकट करणे” तसे शिवसेनेचे नेते “खंजीर हलवून बळकट करताहेत काय…??” शिवसेनेच्या नेत्यांना आपल्या पाठीत खंजीर खुपसून कोणीतरी दुसऱ्याबरोबर सत्तेसाठी पाट लावण्याची भीती वाटते आहे काय…?? यासाठी ते वारंवार खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची आठवण करून देऊन आपल्या पाठीतला संभाव्य खंजीर आधीच काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत काय…?? या सर्व शंका येण्याचे कारण गेल्या महिनाभरातली शिवसैनिकांची म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांची राजकीय वक्तव्ये आहेत.



याची सुरुवात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादा पाटलांना प्रत्युत्तर देताना आव्हानवीराच्या भाषेत केली. ते म्हणाले, होते की शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक तरी उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडून देतो. ही मराठ्यांची अवलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा समोरून कोथळा काढला होता. वगैरे भाषा वापरून त्यांनी शरद पवारांनाच पाठीत खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची आठवण करून दिली होती.

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्याच प्रकारचे वक्तव्य सूचित केले होते आणि आज अनंत गीते यांनी वरकडी करून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे असे “ॲक्शन पँक्ड” वक्तव्य करून टाकले.

संजय राऊत यांचे वक्तव्य पवारांना अनुकूल आहे असे सकृतदर्शनी दिसले तर अनंत गीते यांचे वक्तव्य अर्थातच पवारांना प्रतिकूल होते. पण शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ते वारंवार खंजीर खुपसण्याच्या राजकारणाचा उल्लेख करत आहेत. यातून पवारांना सातत्याने त्यांच्या राजकारणाची आठवण करून देऊन शिवसेनेच्या बाबतीत हे कराल तर…, असा इशारा तर ते देत नाहीत ना…!! अशी शंका येत आहे.

कारण उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसण्याच्या राजकारणाचा अजिबात उल्लेख न करता संभाजीनगरच्या मराठवाडा मुक्ति दिनाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, “माझे भावी सहकारी” एवढाच उल्लेख केला आहे आणि पवार जर आपल्या राजकारणाच्या जुन्या वळणाने जाणार असतील तर आपल्यालाही आपल्या जुना वळणाचा मार्ग मोकळा आहे हेच यातून त्यांनी सूचित केले आहे.

बाकी अनंत गीते यांच्या मुखातून शिवसैनिकांची खदखद, वेदना, भावना, मनाला लागलेली टोचणी, राष्ट्रवादीकडून होत असलेली कोंडी अशी प्रतिक्रिया व्यक्त करून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेतृत्वाला टोचून घेतले आहेच, पण हा विषय अशा टोलेबाजीच्या पलिकडचा दिसतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला दगाफटका करणार याची शिवसैनिकांना मनातून खात्री वाटायला लागली आहे आणि यातूनच संजय राऊत, अनंत गीते यांच्यासारखे नेते अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही भाषांमध्ये पवारांना खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची आठवण करून देत आहेत. वास्तविक हा पवारांना इशारा आहे. ते जर “तसे” करणार असतील तर शिवसैनिकही त्यांचे जुने “खंजिरी राजकारण” उपसून काढतील, असे मानायला वाव आहे…!!

Shiv sena leaders pinched sharad pawar over his back stabbing politics in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात