बेकायदेशीर दारू विक्री करणार्या सराईतला एक वर्षासाठी राहणार्या सराईताला एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. Illegal wine selling person arrested by police under MPDA act
विशेष प्रतिनिधी
पुणे : सहकारनगर पोलीस ठाणे हदीमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणार्या सराईतला एक वर्षासाठी राहणार्या सराईताला एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली आहे. त्यांनी केलेली एमपीडीएची 61 वी कारवाई आहे.
चंद्रकांत उर्फ चंदर बासु चव्हाण (वय 49 वर्षे, रा. बालाजी निवास, के के मार्केट गेट नं. 1, नाल्याजवळ, बालाजीनगर, पुणे) असे स्थानबध्द करण्यात आलेल्याचे नाव आहे. चव्हाणने त्याचे साथीदारांसह सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारुची विक्री करणे यासारखे 6 गुन्हे केलेले आहेत.
त्याच्या कृत्यामुळे फक्त मानवी जीवनास धोका निर्माण झालेला नसून, कित्येक गरीब संसार देखील उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील गैरकृत्यांमुळे लोकांचे आरोग्यास धोका निर्माण झालेला असून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांची सदर भागात दहशत असल्याने त्याचे भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App