The Kerala Story : 32000 केरळी मुलींच्या तस्करी आणि धर्मांतराची भयावह कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!!


प्रतिनिधी

मुंबई : काश्मीर मधील 1990 च्या दशकातील काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे भयावह सत्य दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” गाजत असतानाच आणि त्यातून हिंदू समाजात प्रचंड जनजागृती झाली असताना अशाच एका भयावह विषयावर दुसरा सिनेमा येतो आहे… “द केरळ स्टोरी”…!! The horrific story of the trafficking and conversion of 32000 Kerali girls will soon be on the big screen

– ISIS दहशतवाद्यांची काळी कृत्ये

केरळमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 32000 मुली गायब झाल्या. त्यांचा ना कुठे शोध लागला ना कुठे पत्ता लागला. त्यांचे बळजबरीने इस्लाम मध्ये धर्मांतर करून त्यांची तस्करी केली. याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS (आयएसआयएस) याचे फंडिंग आणि त्या दहशतवाद्यांची दहशतीच्या बळावर 32000 केरळी मुलींचे धर्मांतर करून तस्करी करण्यात आली. अनेक मुस्लीम देशांमध्ये त्यांची विक्री करण्यात आली. हे भयानक सत्य मांडण्याचा प्रयत्न “द केरळ स्टोरी” या सिनेमातून विपुल शहा आणि सुदिप्तो सेन यांनी केला आहे.

– टीझर रिलीज

या सिनेमाचा टिझर त्यांनी नुकताच रिलीज केला आहे. टिझर मध्ये केरळचे कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचे एक वक्तव्य दाखवण्यात आले आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या प्रतिबंधित संघटनेचा केरळला मुस्लिम राज्य बनवण्याचा डाव आहे. येत्या 20 वर्षात केरळ मुस्लिम बहुल राज्य बनवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न चालवला असून त्यांना ISIS (आयएसआयएस) सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे फंडिंग आहे, असे वक्तव्य अच्युतानंदन यांनी उघडपणे केले होते. ते या सिनेमाच्या टिझर मध्ये दाखवण्यात आले आहे.

अच्युतानंदन यांनी हे वक्तव्य 24 जुलै 2010 रोजी केले होते. अच्युतानंदन हे केरळमध्ये सुप्रसिद्ध कम्युनिस्ट नेते होते. ते हिंदुत्ववादी नेते नव्हते. 2006 ते 2011 या पाच वर्षांच्या कालावधीत ते केरळचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी केरळ मुस्लिम राज्य बनवण्याचा डाव उघडकीस आणला आहे, असे स्टोरी मध्ये त्यांच्या बाईट नुसार दाखवण्यात आले आहे.

“द काश्मीर फाईल्स”ने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवला आहे. हिंदू समाजात यामुळे फार मोठी जनजागृती झाली आहे. यानंतर “द केरळ स्टोरी” सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येऊन धडकेल. त्यावेळी समाजाची प्रतिक्रिया काय असेल?, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

The horrific story of the trafficking and conversion of 32000 Kerali girls will soon be on the big screen

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण