विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मोदी सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार्या स्मृती इराणी आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. क्योंकी सास भी कभी बहू थी! मधून घराघरात पोहचलेल्या तुलसीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसचं त्यांनी राजकारणात देखील धडाकेबाज परफॉरमंस दिला आणि अमेठीतील घरानेशाही वर थेट वार करत राहुल गांधींचा पराभव केला.Happy birthday Smriti Irani: she is strong, she is the woman of India ..! Special congratulations to Smriti Irani who won Rahul Gandhi’s fort; ‘Tulsi to Amethi’ @ 46
त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा,भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांना अभिनंदनपर संदेश पाठवले आहेत. स्मृती इराणी यांच्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, “केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या प्रयत्नांना तत्परतेने पुढे नेत आहेत. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.
Birthday greetings to Union Minister Smt. @smritiirani Ji, who is assiduously spearheading the Government’s efforts to further women empowerment. May she be blessed with a long and healthy life. — Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022
Birthday greetings to Union Minister Smt. @smritiirani Ji, who is assiduously spearheading the Government’s efforts to further women empowerment. May she be blessed with a long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022
विजया रहाटकर यांनी देखील छानसे ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है प्रभु श्रीराम आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! शुभ जन्मदिन आदरणीय स्मृति ईरानी जी! प्रभु श्रीराम आप की सभी मनोकामनाएं पूर्ण करे! Happy Happywala Birthday dear Smriti ji… pic.twitter.com/NcRUujtaLV — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) March 23, 2022
वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..!
शुभ जन्मदिन आदरणीय स्मृति ईरानी जी!
प्रभु श्रीराम आप की सभी मनोकामनाएं पूर्ण करे!
Happy Happywala Birthday dear Smriti ji… pic.twitter.com/NcRUujtaLV
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) March 23, 2022
क्योंकी सास भी कभी बहू थी’ मुळे घराघरात पोहोचली
स्मृती इराणी यांनी होली चाइल्ड ऑक्झिलियम स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लर्निंगमध्ये प्रवेश घेतला. वडिलांना मदत करण्यासाठी आणि काही पैसे कमवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणूनही काम केले. यादरम्यान कोणीतरी त्यांना मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी दिल्लीहून मायानगरी मुंबई गाठली. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याच वर्षी मिका सिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या अल्बममधील ‘बोलियान’ गाण्यात त्यांनी परफॉर्म केला. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या शोमुळे त्या देशातील घराघरात पोहोचल्या. यापूर्वी एकता कपूरच्या टीमने त्यांना या भूमिकेसाठी नकार दिला होता. मात्र नंतर स्मृती इराणी यांच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. स्मृती इराणी यांनी ‘विरुद्ध’, ‘तीन बहुरानी’ आणि ‘एक थी नायिका’ यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केले.
2010 मध्ये स्मृती भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षा झाल्या. 2019 मध्ये अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचा गड उद्ध्वस्त करून राहुल गांधींना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App