तामिळनाडू मध्ये ७३,००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात ७३ हजारांहून अधिक सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचा रस्ता खुला झाला आहे. सरकारने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात, दिग्गज कंपन्यांकडून थेट भरती अंतर्गत ७३,००० हून अधिक नोकऱ्या दिल्या जात आहेत. विशेषतः ही संधी तामिळनाडूतील तरुणांसाठी आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी रविवारी चेन्नईमध्ये मोठ्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. यामध्ये ५०० हून अधिक आघाडीच्या कंपन्या सहभागी होत आहेत. More than 73,000 jobs available in Tamil Nadu

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी टीव्ही कार्यक्रम सुरू करणे या कार्यक्रमात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री टी एम अंबारसन, कामगार कल्याण आणि कौशल्य विकास विभागाचे मंत्री सी व्ही गणेशन आणि अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.



मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २० उमेदवारांना नियुक्तीपत्रे

कामगार कल्याण आणि कौशल्य विकास विभागाने आयोजित केलेल्या मोहिमेअंतर्गत स्टॅलिन यांनी २० उमेदवारांना नोकरीची ऑफर दिल्याचे अधिकृत माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. शहराजवळ चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या शहरातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील नोकरी शोधणाऱ्या तरुणांनीही या मोठ्या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. यात सहभागी होणाऱ्या ५०० हून अधिक कंपन्यांपैकी बहुतांश खासगी क्षेत्रातील कंपन्या आहेत.

कंपन्यांनी या रोजगार मेळाव्याद्वारे ७३,९५० रिक्त पदांची घोषणा केली आहे. शुभारंभाच्या वेळी स्टॅलिन यांनी पहिल्या २० उमेदवारांना नोकरी मिळाल्याबद्दल नियुक्तीचे आदेश दिले. कार्यालयाने सांगितले की आर्थिक वर्षात ३६ मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मे २०२१पासून ४१,२१३ उमेदवारांची निवड करण्यात आली आणि त्यांना नोकरीच्या ऑफर देण्यात आल्या. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या सहकार्याने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

More than 73,000 jobs available in Tamil Nadu

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात