विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कर्नाटकात हिजाबवरून सुरू असलेला वाद औरंगाबादला आणण्याचा डाव वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांनी आखला आहे. जय श्रीरामच्या विरोधात अल्ला हो अकबरच्या घोषणा देणाºया हिजाब गर्लला औरंगाबादला सत्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केल. मात्र, पोलीसांनी या सभेला परवानगी नाकारली.Bahujan Aghadi-Muslim Ittehad Fronts conspircy to bring Karnataka’s pain to Aurangabad
हिजाबवरील वादामुळे कर्नाटकातील अनेक शहरांतील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. मुस्लिमबहुल असलेल्या औरंगाबादमध्येही यावरून वातावरण तापविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची आज औरंगाबाद शहरातील आमखास मैदानावर सभा होणार होती. या सभेला काही तासाच शिल्लक राहिले असताना औरंगाबाद पोलिसांनी सभेची परवानगी नाकारली आहे.
या सभेस कर्नाटकमधील हिजाब गर्ल मुस्कान देखील येणार होती. वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांच्याकडून मुस्कानचा सत्कार केला जाणार होता. मात्र, त्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता.सोमवारी शहरातील आमखास मैदानावर बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट याची जाहीर सभा होणार आहे.
अशी माहिती स्वत: दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. या सभेत कर्नाटकमधील हिजाब गर्ल मुस्कानचे देखील सत्कार करण्यात येणार होते.या सभेला भाजपने विरोध केला असून, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर म्हणाले की, कर्नाटकमधील हिजाब गर्ल मुस्कान खान हिला शहरातील काही राजकीय पक्ष बोलवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
त्यामुळे मुस्कान खानला शहरात बोलावून कुणीही जर राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा राजकीय पोळी शेकत असेल तर त्याला भाजप रस्त्यावर उतरून विरोध करेल. अशा पद्धतीचे राजकारण आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तसेच मुस्कान खानला शहरात अशा कार्यक्रमासाठी परवानगी देऊ नये अशीही मागणी पोलिस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती केनेकर यांनी दिली.
कर्नाटकमध्ये हिजाब वाद सुरू असताना, एका शाळेत हिंदू समाजातील मुलांनी भगवे उपरणे घालत शाळेमध्ये जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या सर्व मुलांविरोधात मुस्कानने अल्लाहू अकबरचा नारा दिला होता. तेव्हापासून तिच्या धाडसाचे कौतूक करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App