तिलक, कुंकू, टिकली काढण्यास भाग पाडल्यास कठोर कारवाई ; कर्नाटकचे शिक्षणमंत्री नागेश


वृत्तसंस्था

बंगळूर : विद्यार्थांना तिलक, कुंकू, टिकली काढण्यास भाग पाडल्यास शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी नागेश यांनी दिला आहे.Strict action will be taken against educational institutions if they force students to remove tilak, kumkum, bindi etc: Karnataka Education Minister BC Nages

हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी नागेश यांनी इशारा दिला आहे की, ज्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यापासून तिलक, कुंकू , टिकली, सिंधुर इत्यादींना रोखले जाईल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.



प्रसारमाध्यमांशी बोलताना नागेश म्हणाले की, कुंकू, सिंधूर आणि टिकली ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. त्यांचा वापर शोभेच्या वस्तू म्हणून केला जातो. त्यामुळे त्याची तुलना हिजाबशी होऊ शकत नाही,जो पूर्णपणे धार्मिक पोशाख आहे. कुंकू , सिंधुर वगैरे लावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंत्र्यांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना दिला.

मंत्री म्हणाले की, हिजाब धर्माचे प्रतिनिधित्व करतो, तर बांगड्या,कुंकू, तिलक हे केवळ दागिने आहेत.हे दागिने शाळेत घालण्याबाबत कोणतेही कठोर नियम नाहीत आणि विद्यार्थी हे स्वेच्छेने घालतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुंकू, तिलक वगैरे काढायला सांगू नये, असेही ते म्हणाले

विजयपूर जिल्ह्यातील कुंकवाचा नाम असलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून रोखल्याच्या घटनेनंतर हे घडले आहे. या घटनेमुळे राज्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Strict action will be taken against educational institutions if they force students to remove tilak, kumkum, bindi etc: Karnataka Education Minister BC Nages

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात