योगी म्हणाले होते मुस्लिम माझ्यावर प्रेम करतात आणि मी मुस्लिमांवर प्रेम करतो.UP ELECTION RESULTS 2022 LIVE: ‘Modi-Yogi’ Raj even in Muslim-majority constituencies! BJP in 46 out of 73 Muslim-majority constituencies … slaps Congress for considering Muslims …
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : एका मुलाखतीत योगींना विचारले होते तुम्ही म्हणाला होता की, माझे मुस्लिमांशी जसे नाते आहे तसेच त्यांचे माझ्याशी आहे, याचा अर्थ काय? या प्रश्नाच्या उत्तरात योगी म्हणाले, “माझंही तेच नातं आहे, त्यांच्यकडून मला तीच वागणूक मिळते जी मी त्यांना देतो . ते माझ्यावर प्रेम करतात, मी त्याच्यावर प्रेम करतो.”आता हे वक्तव्य खरं ठरत आहे कारण मुस्लिमबहुल क्षेत्रातही योगिंची जादू दिसून येत आहे .वर्षानुवर्ष मुस्लिमांवर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला ही जबरदस्त चपराक आहे.
मुस्लीमबहुल मतदारसंघातही ‘योगी’राज उत्तर प्रदेशातलं राजकारणात प्रथमपासूनच जाती-पाती आणि धर्म हे मुद्दे वरचढ ठरले आहेत. अयोध्येचं राम मंदिर हा अनेक वर्षं राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं. भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनेही या मुद्द्यांना वेळोवेळी महत्त्व दिलं होतं.
मोदी लाटेतही उत्तर प्रदेशातील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये भाजपला फारशी आशा नव्हती. या वेळी मात्र चित्र पालटलं आहे. 73 मुस्लीमबहुल मतदारसंघांपैकी 46 मध्ये भाजप उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 73 मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. या भागातून भाजपला यापूर्वी फारशी संधी मिळालेली नव्हती. या वेळी मात्र या 73 पैकी 46 मतदारसंघांमध्येही भाजपच आघाडीवर आहे. वर्षानुवर्षं मुस्लीम मतं गृहित धरणाऱ्या काँग्रेसला या 73 पैकी एखाद्याच मतदारसंघाने हात दिला आहे.
2017 च्या निवडणुकीत आणखी आश्चर्यकारक बाब म्हणजे मुस्लिमबहुल भागात किंवा कोणालाही अपेक्षित नसलेल्या जागांवर भाजपचा विजय. भाजपने 82 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या जिथे मुस्लिम मतदार लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहेत.
उत्तर प्रदेशात सुमारे २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. राज्यातील एकूण 403 जागांपैकी 143 जागांवर मुस्लिमांचा प्रभाव आहे. यापैकी 70 जागांवर मुस्लिम लोकसंख्या 20 ते 30 टक्के आहे. 73 जागा अशा आहेत जिथे मुस्लिम 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. राज्यात अशा सुमारे तीन डझन विधानसभेच्या जागा आहेत, जिथे मुस्लिम उमेदवार स्वबळावर जिंकू शकतात, तर सुमारे 107 विधानसभा जागा आहेत जिथे अल्पसंख्याक मतदार निवडणुकीच्या निकालांवर खूप प्रभाव टाकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App