येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.Sadabhau Khot’s reply to Sharad Pawar, Those who come will come, but your destiny is not the chair of the post of Prime Minister

शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात बोलताना काही जण निवडणूक होण्यापूवीर्चं मी येणार मी येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही असं म्हटलं होतं. पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती.



 

त्या यात्रेची टॅगलाईन मी पुन्हा येईन ही होती.शरद पवार यांच्या या वक्तव्यावर खोत म्हणाले, येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की असल्याचं ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.

Sadabhau Khot’s reply to Sharad Pawar, Those who come will come, but your destiny is not the chair of the post of Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात