मायक्रोसॉफ्ट हैद्राबादमध्ये उभारणार देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : मायक्रोसॉफ्टकडून देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर हैदराबादमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून पुढील १५ वर्षांत १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.Microsoft to set up country’s largest data center in Hyderabad

तेलंगणामध्ये करण्यात येणारी ही दुसरी सर्वात मोठी विदेशी थेट गुंतवणूक ठरेल. यापूर्वी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने २.७७ अब्ज डॉलर्स गुंतवत मुंबईनंतर राज्यात दुसºया क्रमांकाची गुंतवणूक केल्याचे राज्याचे आयटी आणि औद्योगिक मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले.



सध्या देशात मुंबई, पुणे व चेन्नई या ठिकाणी कंपनीचे डेटा सेंटर कार्यरत आहेत. हैदराबादमधील नवीन डेटा सेंटरमुळे कंपनीच्या देशातील ग्राहकांना क्लाऊड सेवा देण्याची क्षमता विस्तारण्यास मदत होईल. डेटा सोल्यूशन्स, कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय), प्रॉडक्टिव्हिटी टूल्स यासह उद्योग, कंपन्या, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स, शासकीय विभाग यांना अत्याधुनिक डेटा सुरक्षा मिळण्यास मदत होईल,

असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरच्या माध्यमातून २०१६ ते २०२० दरम्यान अर्थव्यवस्थेत ९.५ अब्ज डॉलर्सचा महसूल जमा झाला असून १५ लाख रोजगारनिर्मिती झाल्याचे सांगण्यात येते.

Microsoft to set up country’s largest data center in Hyderabad

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात