विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.Maharashtra’s Chitraratha has not been denied permission Explanation of Directorate of Cultural Affairs
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे.
याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून सदरील कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App