राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.Nashik: As many as 22,000 health workers did not take the second dose, the health department expressed concern
विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यभरात कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली. कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीचा विडाच त्यांनी उचलला. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.तब्बल २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच कोरोना लसीचा दुसरा डोसच घेतला नाही.त्यामुळे आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. हे पहिल्या फळीतले कर्मचारीच ऐनवेळी आजारी पडले आणि लाट तीव्र झाली, तर करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
ज्येष्ठांना १० जानेवारीपासून कोरोनाचा बुस्टर डोस, मात्र दुसरा डोस घेऊन नऊ महिने उलटलेले असणे आवश्यक
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसच घेतला नाही तर बूस्टर डोस कधी घेणार.दरम्यान या कर्मचाऱ्यांचे लसीकरण कसे वाढवायचे, लोकांचे प्रबोधन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच प्रबोधन कसे करायचे,असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App