ST Strike : कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन


नोटीस वाचल्यानंतर वाणी यांना हृदयविकाराचा झटका आला .दरम्यान ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाणी यांचा वाटेतच मृत्यू झाला.ST Strike: Jalgaon ST employee dies of heart attack after receiving show cause notice


विशेष प्रतिनिधी

जळगाव : मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत.दरम्यान मुदत देऊनही संपकरी कर्मचारी कामावर परतायला तयार नसल्याने आता एसटी महामंडळाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी व्यवस्थापन कारणे दाखवा नोटीस बजावत बडतर्फीची कारवाई करत आहे.दरम्यान जळगावमध्ये अशाच पद्धतीने नोटीस बजावण्यात आलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.


ST Strike : आंदोलनाच्या तणावामुळे आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या


जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारात एसटी वाहक राजेंद्र वाणी कार्यरत होते.दरम्यान संपात सहभागी झालेल्या वाणी यांना एसटी प्रशासनाने कामावर रुजु होण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली.दरम्यान ही नोटीस वाचल्यानंतर वाणी यांना हृदयविकाराचा झटका आला .दरम्यान ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाणी यांचा वाटेतच मृत्यू झाला.

चोपडा आगारातील संतप्त कर्मचाऱ्यांनी वाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी नाहीतर मृत वाणी यांचा मृतदेह आगारात आणण्याचा इशारा दिला.दरम्यान आगारप्रमुखांनी विभाग यंत्रणेशी संपर्क साधून वाणी यांच्या मुलाला नोकरी देण्याचं लेखी आश्वासन दिलं. यानंतर वाणी यांच्यावर चर्हाडी या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ST Strike: Jalgaon ST employee dies of heart attack after receiving show cause notice

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण