प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकार कृषी कायदे पुन्हा आणू शकते, असे विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे.Prime Minister’s apology insulted by Agriculture Minister; Rahul Gandhi’s Tikastra on the alleged statement of bringing back agricultural laws
आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांनी लिहिले आहे, की केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या माफीचा अपमान केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतीही पावले टाकली, तर त्याचा आम्ही निषेध करू. अन्नदाता पुन्हा सत्याग्रह करेल. आधी अन्नदात्याने अहंकाराला हरवले आहे. पुन्हा एकदा आम्ही एकजुटीने अहंकार पराभूत करून दाखवू, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायद्यासंदर्भात ते परत आणण्याचे कथित स्वरूपातले विधान आहे. परंतु त्यांनी केंद्र सरकार कृषी कायदे परत आणू, अशा स्वरूपाचे विधान केलेले नाही. कृषी क्षेत्रामध्ये सुधारणांची गरज आहे. देशातल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, अशा स्वरूपाची विधाने नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहेत.
देश के कृषि मंत्री ने मोदी जी की माफ़ी का अपमान किया है- ये बेहद निंदनीय है। अगर फिर से कृषि विरोधी कदम आगे बढ़ाए तो फिर से अन्नदाता सत्याग्रह होगा- पहले भी अहंकार को हराया था, फिर हरायेंगे!#FarmersProtest — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 25, 2021
देश के कृषि मंत्री ने मोदी जी की माफ़ी का अपमान किया है- ये बेहद निंदनीय है।
अगर फिर से कृषि विरोधी कदम आगे बढ़ाए तो फिर से अन्नदाता सत्याग्रह होगा-
पहले भी अहंकार को हराया था, फिर हरायेंगे!#FarmersProtest
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 25, 2021
या विधानांचा विशिष्ट अर्थ काढत प्रसार माध्यमांनी केंद्र सरकार पुन्हा एकदा कृषी कायदे आणणार असल्याचे वक्तव्य कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या तोंडी घातली आहेत. आणि त्यावरूनच राहुल गांधी यांनी कृषिमंत्री पंतप्रधानांच्या माफीचा अपमान करत असल्याचा श्र्लेश काढला आहे. त्यावर आधारित त्यांनी ट्विट करून अन्नदाता पुन्हा सत्याग्रह करेल, असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App