हिंदू – हिंदुत्व – गाय मुद्द्यांवरून सावरकरांचा “अर्धा” हवाला देत दिग्विजय सिंगांनी भाजप नेत्यांना घेरले!!; पण सावरकरांनी नेमके लिहिलंय काय??


वृत्तसंस्था

भोपाळ : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे काँग्रेस नेत्यांनी हिंदू – हिंदुत्व या मुद्द्यांवर भाजपने नेत्यांना टार्गेट करायचे ठरवले आहे. भोपाळमध्ये आज काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हवाला देत हिंदू – हिंदुत्व आणि गाय या मुद्द्यांवरून भाजपने त्यांना टोचून घेतले. Veer Savarkar in his book has written that the Hindu religion doesn’t have any relation with Hindutva.

काँग्रेसच्या मेळाव्यात दिग्विजय सिंग म्हणाले, की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असे स्वतः सावरकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यांनी पुढे जाऊन तर असेही लिहिले आहे, की गाय हा एक सर्वसामान्य पशु आहे. ती मनुष्याची माता असू शकत नाही आणि गोमांस खाणे हे काही पाप नाही.

दिग्विजय सिंग पुढे म्हणाले, मी आत्ता सांगितले हे काँग्रेसच्या किती नेत्यांना माहिती आहे? परंतु आता हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते भाजप नेत्यांसमोर जाऊन हा मुद्दा ते काढतील का?, असा सवाल त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी मधल्या कार्यक्रमात परवाच गाय काही लोकांसाठी “गुन्हा” असू शकते. परंतु आमच्यासाठी ती माताच आहे, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेस नेत्यांना घेरले होते. त्यालाच दिग्विजय सिंग यांनी सावरकरांच्या लेखनाचा हवाला देत प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.

– सावरकर म्हणतात, गोपूजन नव्हे, गोपालन…!!

सावरकरांच्या लेखनामध्ये गोपूजन आणि गोपालन यासंबंधी स्पष्ट उल्लेख आहेत. सावरकर गाईची अंधभक्ती नाकारतात. गाईमुळे पाप नष्ट होते किंवा गायीच्या पोटात देवतांचा वास असतो अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धा ते नाकारतात. त्यामुळे त्यांनी लेखनामध्ये गोपूजन करू नका, पण गोपालन अवश्य करा आणि ते शास्त्रीय दृष्टीने करा असे स्पष्ट म्हटले आहे.

परंतु आता काँग्रेस नेते सोयीस्कररीत्या सावरकरांच्या नावाचा वापर करून सावरकरांनी जणू गोहत्येचे समर्थनच केले होते, अशा स्वरूपाचे अशा स्वरूपाची विधाने करून संपूर्ण समाजाची दिशाभूल करताना दिसत आहेत.

सावरकरांनी शास्त्रीयदृष्ट्या गो पालनाचे महत्व पटवून देऊन समर्थन केले आहे. त्यांनी गोहत्येचे केव्हाही आणि कुठेही समर्थन केलेले नाही. परंतु काँग्रेस नेते त्यांच्या एकाच लेखाचा उल्लेख करून कायम सावरकर हे गोहत्येचे समर्थक असल्याचे काय भासवत राहतात.

परंतु सावरकरांनी त्यावेळी आपल्या पहिल्या लेखाविषयी गैरसमज झाल्यानंतर दुसरा लेख लिहून शास्त्रीय दृष्ट्या गोपालन महत्त्वाचे कसे आहे?, याचे सविस्तर विवेचन करून केवळ हिंदूंना डिवचण्यासाठी कोणी गोहत्या करत असेल तर ते निषेधार्हच आहे, हे ठामपणे म्हटले आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा काँग्रेस नेते आणि सावरकर विरोधक सोयीस्कर रित्या बाजूला ठेवतात.

Veer Savarkar in his book has written that the Hindu religion doesn’t have any relation with Hindutva.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात