चिंता वाढली : देशातील १७ राज्यांत ओमिक्रॉनचा संसर्ग, आतापर्यंत एकूण ४३६ रुग्ण, राजस्थानात २१ रुग्ण नव्याने आढळले

436 cases of Omicron in 17 states of the country, 21 new cases in Rajasthan

Omicron : ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन प्रकार देशात झपाट्याने पसरू लागला आहे. ओमिक्रॉन आतापर्यंत 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. देशात आतापर्यंत एकूण 436 रुग्ण आढळले आहेत. 436 cases of Omicron in 17 states of the country, 21 new cases in Rajasthan


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन प्रकार देशात झपाट्याने पसरू लागला आहे. ओमिक्रॉन आतापर्यंत 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. देशात आतापर्यंत एकूण 436 रुग्ण आढळले आहेत. 108 बाधितांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, तर एकूण 79 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात (43), तेलंगणा (38), केरळ (37), तामिळनाडू (34), कर्नाटक (31), राजस्थान (22), ओडिशा (4), हरियाणा (4), पी. बंगाल (3), जम्मू-काश्मीर (3), उत्तर प्रदेश (2) चंदीगड (1), लडाख (1), उत्तराखंडमध्ये (1) प्रकरणे आहेत.

राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचे नवे 21 रुग्ण

राजस्थानमध्ये ओमिक्रॉनची 21 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी ११ संक्रमित जयपूरचे, सहा अजमेरचे, तीन उदयपूरचे आणि एक महाराष्ट्रातील आहेत. आता राजस्थानमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या 43 झाली आहे.

अनेक राज्यांत निर्बंधांना सुरुवात

दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे.

देशात २४ तासांत कोरोनाचे ७,१८९ नवे रुग्ण

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,१८९ नवे रुग्ण आढळले असून ३८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत 7,286 जण बरेदेखील झाले आहेत.

अहमदनगरात ‘नो लस, नो एंट्री’

अहमदनगरमध्ये ‘नो लस, नो एंट्री’चा आदेश जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांना शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा, सभागृह, विवाह हॉल आणि कार्यक्रमांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

436 cases of Omicron in 17 states of the country, 21 new cases in Rajasthan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था