कृषी कायदे परत येणार का? केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उत्तराने काँग्रेसचा हल्लाबोल, वाचा सविस्तर…

Will Farm laws come back? Congress Criiticizes Union Agriculture Minister Tomars reply, read in detail

Farm laws : शेतकरी आंदोलन संपवून आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एका ट्विटद्वारे आरोप करत त्यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र उघड झाल्याचं म्हटलं आहे. Will Farm laws come back? Congress Criiticizes Union Agriculture Minister Tomars reply, read in detail


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन संपवून आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या एका वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एका ट्विटद्वारे आरोप करत त्यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र उघड झाल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर पुन्हा शेतकऱ्यांवर वार होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

वास्तविक, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांना कृषी कायदे परत येणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले होते की, आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत, पुन्हा पुढे जाऊ.” त्यांच्या याच वक्तव्यावरून सुरजेवालांनी टीका केली आहे.

सुरजेवाला म्हणाले की, मोदीजी 3 काळ्या कृषी कायद्यांसाठी माफी मागतात, देशाचे कृषी मंत्री पुन्हा एकदा त्या कायद्यांचे समर्थन करतात. मोदी सरकारने 3 काळे कायदे रद्द केले, कृषिमंत्री म्हणतात पुन्हा कायदा आणू म्हणतात. सुरजेवाला यांनी नरेंद्र सिंह तोमर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

आम्ही कृषी सुधारणा विधेयक आणले होते, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी नागपुरात सांगितले होते. काही लोकांना हे आवडले नाही, पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर ही एक मोठी सुधारणा होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही सुधारणा प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. तोमर म्हणाले होते की, सरकार निराश नाही, आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे, आम्ही पुढे जाऊ, कारण भारताचा शेतकरी हा भारताचा कणा आहे. पाठीचा कणा मजबूत असेल तर नक्कीच देश मजबूत होईल.”

Will Farm laws come back? Congress Criiticizes Union Agriculture Minister Tomars reply, read in detail

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात