कोट्यावधी जनतेशी जोडणारी भाजपशी देणगी संपर्क मोहीम सुरू; अटल जयंती ते दीनदयाळ पुण्यतिथी पर्यंत उपक्रम!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोट्यावधी जनतेला जोडून घेणारी भाजपची देणगी संपर्क मोहीम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुरू केली असून ती आज अटल बिहारी जयंती या दिवसापासून ते पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.Donation contact campaign launched with BJP connecting millions of people; Activities from Atal Jayanti to Deendayal Punyatithi

या देणगीचे वैशिष्ट्य असे, की ही नमो ॲप द्वारे ऑनलाइन स्वीकारली जाणार आहे. फक्त पाच रुपये ते एक हजार रुपये अशा विविध टप्प्यांमध्ये आणि पर्यायांमध्ये सर्वसामान्य नागरिक भाजपला देणगी देऊ शकतात. नमो ॲप मध्ये यासाठी विशेष फिचर जोडण्यात आले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक हजार रुपयांची देणगी देऊन या मोहिमेची सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे यासंदर्भात पत्र त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये देणगीची संपर्क मोहिमेची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्र सर्वप्रथम, निस्वार्थी कार्यकर्ते आणि विकासाची विशाल दृष्टी असणारे नेते हे भाजपचे वैशिष्ट्य नड्डा यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे. भाजपचे करोडो कार्यकर्ते जनतेला या तीन मुद्द्यांवर आवाहन करतील

आणि छोट्यातल्या छोट्या गावातील वाड्या-वस्त्यांपासून ते तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत जनतेशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार देणगी देण्यासाठी प्रवृत्त करतील, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे

Donation contact campaign launched with BJP connecting millions of people; Activities from Atal Jayanti to Deendayal Punyatithi

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात