शेतकऱ्यांसाठी अखंड वीज, 15000 कोटींच्या भरघोस तरतुदी; जलयुक्त शिवार साठी 650 कोटी!!

Uninterrupted power for farmers, huge provisions of 15000 crores

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतुदी केल्या. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकरी, महिला, युवक यांना लाभदायक ठरतील अशा अनेक योजना जाहीर केल्या. Uninterrupted power for farmers, huge provisions of 15000 crores

त्यात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची त्यांनी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात अखंडित वीज पुरवठा होणार आहे. त्यांच्या शेतात आता बत्ती गुल होणार नाही. अखंडित वीज पुरवठा झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागणार नाही. आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी या योजनेवर विशेष भर दिला.

15000 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजितदादांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावीसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे.

उपसा जलसिंचन सौरऊर्जा

उपसा जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणे तसेच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी मैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजीत किंमत 1594 कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे या योजनांच्यासाठी 4200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नदी जोड प्रकल्पावर भर

विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील तीन लाख 71 हजार 277 एकर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून 62.57 टीएमसी पाणी वळवण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरावा होणारी जीवित वित्त आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळता यावे यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3200 कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्राचा प्रतीक प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जलयुक्तवर किती खर्च?

जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च 2024 अखेर एकोट पन्नास हजार 651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 38 जलाशयातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे लोकसभागाच्या आतापर्यंतच्या 83 आतापर्यंत 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

Uninterrupted power for farmers, huge provisions of 15000 crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात