ICC T20 World Cup : इंग्लडला 68 धावांनी पराभूत करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक!

ICC T20 World Cup India beat England by 68 runs to reach the final of the World Cup

29 जून रोजी भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. ICC T20 World Cup India beat England by 68 runs to reach the final of the World Cup

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (23 धावांत तीन विकेट) आणि कुलदीप यादव (19 धावांत तीन विकेट) यांच्या घातक फिरकी गोलंदाजीमुळे भारताने T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 29 जून रोजी भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

नाणेफेक गमावल्यानंतरही कर्णधार रोहित शर्माच्या (57) सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात 20 षटकांत सात गडी गमावून 171 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. भारतीय फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव अवघा 16.4 षटकांत 103 धावांवर आटोपला. अक्षर आणि कुलदीपच्या प्रत्येकी तीन बळींशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 12 धावांत दोन बळी घेतले. इंग्लंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.

2022 साली मेलबर्न येथे झालेल्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाने ब्रिटीशांना पराभूत करून केवळ पराभवाचे उट्टेच काढले नाहीत, तर अंतिम फेरीत धडकही मारली आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडिया याआधी 2007 आणि 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. आता भारताचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

ICC T20 World Cup India beat England by 68 runs to reach the final of the World Cup

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात