केरळच्या बदनामीचा आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांचा आरोप
वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम : कोरोना व्यवस्थापनाचा आदर्श नमूना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चे अपयश आता उघड्यावर आले आहे. देशात करोनाचे ४३ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले, त्यापैकी तब्बल २२ हजार १२९ म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्या लाटेची सुरूवात केरळमधून होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या लाटेत देखील बकरी ईद सारख्या सणांना सवलती देण्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. Seroprevalence study by ICMR shows that almost 42% of people have antibodies in them, shows that our preventive mechanism was very good
एवढे असूनही केरळमधल्या डाव्या आघाडीच्या सरकारने “नाक वर” करून आपल्याविरुद्ध बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी हा आरोप केला आहे.
कोरोना व्यवस्थापनामध्ये केरळ राज्याने अभुतपूर्व कामगिरी केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, केरळमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये होणारी भयावह रूग्णवाढ पाहता कथित केरळ मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. गेल्या ५१ दिवसात प्रथमच एखाद्या राज्यात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता त्याची सुरूवात केरळमधून होण्याची शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, वीणा जॉर्ज यांनी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत असल्याचा इन्कार केला आहे. 42 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यात हे केंद्राने मान्य केले आहे तरी ही आकडेवारी वाढते हे कसे स्वीकारणार?, असा सवाल त्यांनी केला आहे. केरळ मधली 50 टक्के लोकसंख्या कोरोनाने बाधित झालेली नाही, असा दावाही जॉर्ज यांनी केला आहे.
More than 50% of the total population is still unaffected. The type of Coronavirus which is spreading in this phase is Delta virus, the infectability is more. So, naturally, we are trying our best: Kerala Health Minister Veena George — ANI (@ANI) July 29, 2021
More than 50% of the total population is still unaffected. The type of Coronavirus which is spreading in this phase is Delta virus, the infectability is more. So, naturally, we are trying our best: Kerala Health Minister Veena George
— ANI (@ANI) July 29, 2021
मात्र, आपल्याच विधानाला छेद देणारे पुढचे विधानही त्यांनी केले आहे केरळमध्ये झिका व्हायरस वाढतो आहे. त्यामुळे केंद्राने केरळमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी वीणा जॉर्ज यांनी केली आहे.
धक्कादायक म्हणजे केरळमध्ये एका दिवसात १५६ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत केरळमध्ये १६ हजार ३२६ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ११६५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या केरळमध्ये १ लाख ४५ हजार ३१७ सक्रिय करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये २ हजारांहून अधिक करोना रूग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ४ हजार ०३७ रूग्ण मलप्पुरम येथे, थ्रिसूर मध्ये २ हजार ६२३, कोझिकोडे २ हजार ३९७, एर्नाकुलममध्ये २ हजार ३५२ आणि पलक्कड जिल्ह्यात २ हजार ११५ रूग्ण आहेत.
केरळमध्ये सातत्याने रूग्णवाढ होत असतानाही डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्यात तीन दिवसांसाठी करोनाविषयक निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता राज्यातील व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन सूट दिल्याचे केरळ सरकारने न्यायालयास सांगितले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील तीव्र नाराजी व्यक्त करून केरळ सरकारला झापले होते.
– उत्तर प्रदेशात २४ तासात केवळ १८ रूग्ण
कोरोना व्यवस्थापनासाठी केरळचे कौतुक करताना उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्यात येत होते. मात्र, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये केवळ १८ नवे करोना रूग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात सध्या ७९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ६ कोटी ४५ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उ.प्र. प्रशासनाने चाचण्या, उपचार आणि लसीकरणासाठी आक्रमक धोरण अवलंबविल्यानेच उत्तर प्रदेशात करोना संसर्ग नियंत्रणात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App