वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर मधील हिंसक घटनेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी भरपूर राजकारण करून घेतले असले तरी अजूनही त्या पक्षाचे नेते लखीमपूरच्याच मुद्द्यामध्ये “अडकलेले” दिसत आहेत. प्रियांका गांधी यांनी हा मुद्दा जास्त लावून धरला असल्याने अन्य काँग्रेस नेत्यांनी देखील त्याला हवा केली आहे.Samajwadi Party president Akhilesh Yadav will embark on a ‘Samajwadi Vijay Yatra’
पण या सगळ्यात उत्तर प्रदेश मधले विरोधी पक्षाचे सगळ्यात मोठे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मात्र वेगळे ठरत आहेत. त्यांनी लखीमपूरला भेट अवश्य दिली. परंतु, त्या मुद्द्यात अडकण्यापेक्षा त्यांनी आपल्या समाजवादी पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी वेगळा मार्ग चोखाळला आहे. ते येत्या 12 तारखेपासून समाजवादी विजयी यात्रेवर निघत आहेत. उत्तर प्रदेशात पाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर ही यात्रा कापणार आहे.
Lucknow | Samajwadi Party president Akhilesh Yadav will embark on a 'Samajwadi Vijay Yatra' from October 12, ahead of 2022 Assembly polls pic.twitter.com/W1NpizYldP — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 9, 2021
Lucknow | Samajwadi Party president Akhilesh Yadav will embark on a 'Samajwadi Vijay Yatra' from October 12, ahead of 2022 Assembly polls pic.twitter.com/W1NpizYldP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 9, 2021
राज्यामध्ये योगी आदित्यनाथ सरकार विरोधात वातावरण तापविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लखीमपूर मधील हिंसाचार हा निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो. परंतु तेवढ्यावरच अवलंबून राहून चालणार नाही, अशी अखिलेश यादव यांची धारणा आहे. त्यामुळेच ते स्वतंत्रपणे विजयी यात्रेवर निघाल्याचे दिसत आहे. योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या साडे चार वर्षांमध्ये ज्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई केली त्यामधले बहुतेकजण हे समाजवादी पक्षाचे समर्थक आहेत. पूर्वांचल, मध्य उत्तर प्रदेश या भागात समाजवादी पक्षाचे वर्चस्व होते. ते योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मोडून काढले. या प्रदेशांमध्ये विजय यात्रेच्या निमित्ताने जाऊन अखिलेश यादव समाजवादी पक्षाची “राजकीय दुरुस्ती” करण्याच्या बेतात आहेत आणि म्हणूनच त्यांनी लखीमपूर वरून आपले लक्ष वळवून समाजवादी पक्षाच्या विजयी यात्रेवर केंद्रित केले आहे.
प्रियंका गांधी यांनी जरी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा राजकीयदृष्ट्या लावून धरला असला तरी काँग्रेसचा यातून फारसा फायदा होणार नसल्याचे भाकित निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. हा त्यांचा राजकीय सल्ला काँग्रेस नेत्यांनी ऐकण्याऐवजी अखिलेश यादव यांनी ऐकून त्यानुसार आपले लक्ष समाजवादी पक्षाच्या निवडणूक परफॉर्मन्सवर केंद्रित केल्याचे दिसत आहे.
Samajwadi Party president Akhilesh Yadav will embark on a ‘Samajwadi Vijay Yatra’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App