बसमधील स्फोटामागे भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा कांगावा, भारताकडून आरोपांचा इन्कार


विशेष प्रतिनिधी

बीजींग – भूराजकीय फायदे मिळविण्यासाठी कोणी दहशतवादाचा आधार घेत असल्यास आमचा त्यांना ठामपणे विरोध असेल, असे चीनने स्पष्ट केले. पाकिस्तानात गेल्या महिन्यात एका बसमध्ये बाँबस्फोट होऊन १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ चिनी नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. Pakistan targets India and Afghnistan on bus blast

हल्ल्यासाठीचे वाहन अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते आणि भारताच्या ‘रॉ’ने हल्ला घडवून आणला, असा पाकिस्तानने दावा केला होता. त्यावर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी, हल्ला प्रकरणाची वेगाने चौकशी केल्याबद्दल पाकिस्तानची पाठ थोपटताना, हल्ल्याचा निषेध केला आहे.

‘दहशतवाद हा मानवजातीचा शत्रू असून राजकीय फायदे उठविण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्यास चीनचा ठाम विरोध आहे. सर्व देशांनी एकत्र येत दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा,’ असे या प्रवक्त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या आरोपांचा भारताने इन्कार केला आहे.

Pakistan targets India and Afghnistan on bus blast

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात