Indipendance @75 ! शेरशाह हरदम रहेगा सरहदों को याद तू टायगर हिलवरचा टायगर कॅप्टन विक्रम बत्रा-डिंपल चीमाची अमर प्रेम कहाणी ! ‘ये दिल मांगे मोर’….

Indipendance @75 ! शेरशाह हरदम रहेगा सरहदों को याद तू …
टायगर हिलवरचा टायगर कॅप्टन विक्रम बत्रा-डिंपल चीमाची अमर प्रेम कहाणी ! ‘ये दिल मांगे मोर’….

प्रेम कहाणी मेरे देश की …एक से एक निराली …

कारगिल विजयाला २२ वर्षे पूर्ण झाली. या लढाईत कॅप्टन विक्रम बत्रा हे शहीद झाले. त्यांच्या परक्रमाची गाथा सर्वश्रृत आहे. पण सध्या शेरशाह या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलोय त्यांची अमर प्रेम कहाणी …

डिंपल चीमा या आजही बत्रांची वाट पाहतात.त्यांनी कोणाशी लग्नही केले नाही….


विशेष प्रतिनिधी

चंदिगडः आज भारताचा स्वातंत्र्य दिवस ..अनेक शहिदांचे बलीदान या भारत मातेने पाहिले .. कारगिल युद्धातील असेच एक हिरो …शहीद शेरशाह .. कॅप्टन विक्रम बत्रा ( capt vikram Batra )…. यांचे शौर्य सर्वांच्या स्मरणात आहे. देशासाठी बलिदान देण्याची त्यांची जी तडफ होती फक्त यामुळेच त्यांची आठवण केली जात नाही तर त्यांची प्रेयसी डिंपल चिमाच्या असिम प्रेमासाठीही ते ओळखले जातात. Indipendance 75! Shershah the borders will always remember you …Immortal love story of Tiger Captain Vikram Batra-Dimple Cheema on Tiger Hill!

कारगिलच्या १९९९ च्या लढाईत कॅप्टम विक्रम बत्रा हे १६ हजार फूट उंचीवर शत्रूशी लढता लढता शहीद झाले होते.

डिंपल चिमा आणि विक्रम बत्रा पहिल्यांदा चंदिगडच्या पंजाब विद्यापीठात १९९५ मध्ये भेटले होते. दोघांनी इंग्रीत एमएसाठी प्रवेश घेतला होता. पण दोघेही ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. नशिबाने आम्ही जवळ आलो, असं डिंपल सांगतात.

१९९६ मध्ये विक्रम बत्रा यांचे इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) डेहराडूनसाठी निवड झाली. यामुळे त्यांना लग्न करता आलं नाही. पण दोन आत्मा केंव्हाच एक झाल्या होत्या .

डिंपल चिमा सांगतात-

दोघे कायम मनसा देवी मंदिर आणि गुरुद्वारा श्री नदा साहेब येथे दर्शन आणि प्रार्थनेसाठी जायचो,एक फेरा मारल्यानंतर विक्रम बत्रा हे अचानक म्हणाले, ‘अभिनंदन मिसेस बत्रा, आपण दोघांनी सोबतीने चार फेरे मारले, तुमच्या लक्षात आलं नाही’. हे ऐकून मी स्तब्ध झाले. आपल्या नात्यासंबंधी ते कटिबद्ध होते.

आणखी एका भेटीत डिंपल यांनी विक्रम बत्रांना लग्नाबद्दल विचारलं होतं. त्यावेळी विक्रम यांनी आपल्या पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला. यानंतर आपल्या अंगठ्याने त्यांनी डिंपल यांची भांग रक्ताने भरली. हा जीवनातील सर्वात अनमोल क्षण होता, असं डिंपल यांनी सांगितलं. डिंपल विक्रम बत्रा यांची वाट पाहत राहिल्या. ते शहीद झाल्यानंतरही त्यांच्या प्रतीक्षेत त्या आहेत. डिंपल यांनी लग्न केलं नाही.

‘शेरशहा’ होते विक्रम

कॅप्टम विक्रम बत्रा यांच्या शौर्यापुढे पाकिस्ताने सैन्यही झुकले होते. पाकिस्तान आपल्या बातचीतमध्ये त्यांचा उल्लेख ‘शेरशहा’ नावा करत होते. ७ जुलै १९९९ ला जेव्हा ते शहीद झाले त्यावेळी डेल्टा कंपनीने पॉइंट ५१४० जिंकले होते. पॉइंट ४७५० आणि पॉइंट ४८७५ वरील शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. गोळी लागण्यापूर्वी त्यांनी शत्रूचे तीन सैनिक ठार केले होते. त्याचा घोषिणा होती ‘ये दिल मांगे मोर’. त्यावेळी ही घोषणा खूप प्रसिद्ध झाली होती.

कारगिल लढाईत सर्वात कठीण मोहीम फत्ते करणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा मरणोत्तर परमवीर चक्राने गौरव करण्यात आला. भारतीय सैन्याकडून दिला जाणारा हा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार आहे.

Indipendance 75! Shershah the borders will always remember you …Immortal love story of Tiger Captain Vikram Batra-Dimple Cheema on Tiger Hill!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात