विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यावर मुकुल रॉय यांनी तृणमूल कॉँग्रेसचा रस्ता धरला. मात्र, पुन्हा तृणमूलमध्ये जाऊन तीन महिने झाले तरी तृणमूल कॉँग्रेसचे वळण त्यांच्या जीभेला लागेना असे चित्र आहे. एका कार्यक्रमात बोलताना रॉय यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. भाजपाचाच पोटनिवडणुकीत विजय होईल, असे ते म्हणाले.Mukul Roy did not change his mind to say Trinamool Congress, reiterated that only BJP will win by-elections
भाजापामध्ये असताना रॉय सातत्याने पत्रकार परिषदा घेत असत. भाजपाचाच विजय होईल, असा दाव करत असत. त्यामुळे आता त्यांना अडचण येऊ लागली आहे. विधानसभेची निवडणूक जिंकल्यावर काही दिवसांतच रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा भाजपाच विजयी होईल, असा दावा केला. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
यापूर्वी नादिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राज्यात पोटनिवडणूक भाजप जिंकेल. असे म्हटले होते. मात्र, त्यांना चुकीची जाणीव झाल्यावर त्यांनी घाईघाईने सारावासारव केली. ज्येष्ठ राजकारणी आणि एकेकाळी तृणमूल कॉँग्रेसचे चाणक्य समजले जाणारे रॉय यांनी २०१७ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होऊन भाजपमध्ये सामील झाले होते.
२ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये परतले होते.आमदारकी रद्द होण्याच्या भीतीने रॉय अद्यापही अधिकृतपणे भाजपाचेच अ ाहेत. आपण कोणत्या पक्षाचे आमदार आहात असे विचारले असता रॉय म्हणाले, मी भाजपचा आमदार आहे.
रॉय म्हणाले की, पक्षाने आदेश दिल्यास त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल कॉँग्रेसतर्फे काम करण्यासाठी आपण तयार आहे. त्रिपुरामध्ये भाजप योग्य काम करत नाही. आमचा पक्ष पुढील निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल.
भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, भाजपने पक्षांतर विरोधी कायद्यानुसार रॉय यांना विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची आणि परंपरागतपणे विरोधी पक्षाकडे जाणाऱ्या पीएसीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
तृणमूल कॉँग्रेसच्या सभांना, पत्रकार परिषदांना उपस्थित राहणारे रॉय यांनाअधिकृतपणे भाजपामध्येच राहू देण्यामागे डाव आहे. परंपरागतपणे विरोधक्ष पक्षाकडे पीएसीचे अध्यक्षपद असते. मात्र, रॉय हे भाजपचे आमदार आहेत आणि म्हणूनच पीएसी चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती तांत्रिक आधारावर करण्यात कोणतीही अडचण आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App