विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अफगणिस्तानच्या संपूर्ण भूमीवर जर तालिबानने कब्जा मिळविला तर चीन त्यांच्या सरकारला मान्यता देण्याच्या तयारीत आहे, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तसंकेतस्थळावरील वृत्तात केला आहे. China ready to accept Taliban govt. in Afghanistan
अमेरिकी गुप्तचर विभागाच्या सूत्रांचा हवाला देत या वृत्तात म्हटले आहे की, चीनी अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्येह शांतता करार व्हावा, अशी चीनची अपेक्षा आहे. पण गोपनीय माहितीनुसार अफगाणिस्तानमधील वास्तव परिस्थिती पाहता तालिबानबरोबर औपचारिक संबंध प्रस्थापित करण्याणची तयारी चीन सरकारने सुरू केली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमधील अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने पाठविलेले तीन हजार सैनिक काबूल विमानतळावर पोचले. उर्वरित सैनिक रविवारी येथे येणार आहे. या तैनातीमुळे अमेरिकेची सैन्य वापसीची ३१ ऑगस्टची मुदत पाळली जाणार का, याबद्दल प्रश्नरचिन्ह निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये नव्याने सैन्य पाठविण्याचा अर्थ अमेरिका पुन्हा तालिबानशी युद्ध करणार आहे, असा नाही. ही एक तात्पुरत्या स्वरूपाची मोहीम आहे, असे पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App