बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरुच, गंगा नदीने धोक्याची पातळी गाठली


विशेष प्रतिनिधी

लखनौ – मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्याची स्थिती बिघडली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दोन्ही राज्यातील नदीकाठावर असलेल्या भागात पूर आला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरले असून नागरिक मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. Heavy rain in Bihar and UP worsen flood condition

बिहारच्या नदीकाठावर असलेल्या जिल्ह्यात २२ लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातून गंगा नदी वाहते. बक्सर, भोजपूर, पाटणा, सारन, वैशाली, बेगुसराय, मुंगेर, खगाडिया आणि कटिहारच्या दियारा भागात शेकडो गावे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागत आहे.



उत्तर प्रदेशात अनेक भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील २३ जिल्ह्यातील १२४३ गावांत ५ लाख ४६ हजाराहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सिंचन विभागाच्या मते, बदायूं, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, गाझीपूर, बलिया जिल्ह्यात गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याप्रमाणे ओरिया, जालौन, हमीरपूर, बांदा आणि प्रयागराज येथे यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक वाहत आहे.

Heavy rain in Bihar and UP worsen flood condition

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात