तृणमूल कॉंग्रेस आणि निवडणूक आयोगातील धुसफूस अजूनही कायम, पक्षाच्या शिष्टमंडळाचे गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

कोलकता – आयोगाचे काही निर्णय बघता निवडणूका मुक्त, न्याय्य आणि पारदर्शक वातावरणात होणे अशक्यप्राय ठरत आहे. आयोगाचा दृष्टिकोन पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप तृणमूलच्या संसदीय शिष्टमंडळाने केला आहे. TMC attacks on election commission

खासदार आणि नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यावतीने आयोगाला एक निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात राज्य पोलिसांच्या नियुक्तीला परवानगी न देण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.ते खरे असेल तर हा निर्णय विचित्र आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल राज्यातील पोलिस प्रशासनाच्या लौकीकाची गंभीर निंदा झाली आहे. योग्य पातळीवर हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध होण्याची गरज आहे. हा निर्णय केवळ पश्चिम बंगालपुरता आहे आणि निवडणूका होत असलेल्या इतर तीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तो लागू नाही.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारला मदत व्हावी म्हणून केंद्रीय दले तैनात झाली पाहिजेत. वेगवेगळ्या पक्षांचे सरकार असताना काम केलेल्या राज्य पोलिस दलाला हेतुपुरस्सर दुष्ट ठरविण्यासाठी हे होऊ नये.

TMC attacks on election commission

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*