स्वातंत्र्यदिनी दहशतवादी कारवायांचा कट सुरक्षा दलांनी लावला उधळून


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : स्वातंत्र्यदिनी दहशतवादी कारवायांचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनीजैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आलीय. हे चौघे जण दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते.Terrorist plot foiled by security forces on Independence Day

‘जैश’चे हे चार दहशतवादी स्वातंत्र्य दिनी मोटारसायकलवर आयईडीचा वापर करत मोठा हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते. ड्रोनच्या मदतीनं जमिनीवर धाडण्यात आलेल्या हत्यारांना ‘जैश’च्या सक्रीय दहशतवाद्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी या दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली होती. मोटारसायकलवर आयईडी लावून हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांना रचला होता. यासाठी राज्याशिवाय अनेक शहरांची रेकी या दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती.



या चार दहशतवाद्यांमध्ये इजहार खान नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. इजहार खान हा उत्तर प्रदेशातील शामलीचा रहिवासी आहे. पाकिस्तानातील ‘जैश’चा कमांडर मुनाझिर याच्याकडून इजहार खानला अमृतसरमध्ये ड्रोनच्या सहाय्यानं धाडण्यात आलेली हत्यारं गोळा करून ती दहशतवाद्यांपर्यंत पोहचवण्याचं काम देण्यात आले होते.

इजहार खानने पानिपत तेल रिफायनरीची रेकी करून त्याचे काही व्हिडिओ पाकिस्तानात धाडण्यास सांगण्यात आलं होतं. अयोध्येतील राम मंदिर परिसराचा रेकी करण्याचे इजहार खानला पाकिस्तानातून आदेश देण्यात आले होते. परंतु, हे काम करण्याअगोदरच त्याला जम्मू काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे.

गुप्त सुचनेनंतर सुरक्षा दलानं एक विशेष मोहीम आखली. विशेष ऑपरेशन गट आणि इतर सुरक्षा दलांच्या एका संयुक्त टीमनं टांटाच्या वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान हत्यारांचा मोठा साठा सुरक्षायंत्रणेच्या हाती लागलाय.डोडाचेत प्रभारी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कयूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या या गटानं दहशतवाद्यांच्या अड्ड्याचा शोध घेतला आणि इथून हत्यारं, दारुगोळ्याचा साठा जप्त केला.

Terrorist plot foiled by security forces on Independence Day

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात