प्रधानमंत्री किसान योजनेतील एक हजार रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना


विशेष प्रतिनिधी

लातूर : प्रधानमंत्री किसान योजनेच्या मिळालेल्या दोन हजार रुपयापैकी एक हजार मला दे म्हणून सख्या भावाचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील कासार जवळा येथे घडली. Murder of brother in a dispute of one thousand rupees in Pradhan Mantri Kisan Yojana

वैजनाथ आश्रुबा सुडके (३० रा. कासार जवळा ता. लातूर ) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचा सख्खा धाकटा नागनाथ सुडके (२८) याला अटक केली आहे.

कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. प्रधानमंत्री किसान याेजनेचे दाेन हजार रुपये वैजनाथ यांच्या खात्यावर जमा झाले हाेते. यातील एक हजार रुपये मला दे म्हणून नागनाथ याने वैजनाथकडे तगादा लावला हाेता.



नागनाथ मद्यपी असल्याने वैजनाथने दाेन हजारातील एक हजार रुपये नागनाथ यांच्या पत्नीकडे दिले. यावरून झालेल्या भांडणात वैजनाथ यांच्या डाेक्यात नागनाथने काठी घातली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Murder of brother in a dispute of one thousand rupees in Pradhan Mantri Kisan Yojana

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात