तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारत बनेल महासत्ता ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यात दृढविश्वास


वृत्तसंस्था

पुणे : भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रगत किंवा विशिष्ट अशा तंत्रज्ञानाची गरज आहे. ही गरज भरून काढण्याचे कार्य DRDO सारख्या संस्था करत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.India will become a superpower through technological advancement; Defense Minister Rajnath Singh’s confidence in Pune

पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (DIAT) येथे आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, संरक्षण मंत्रालयाने भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठी पुढाकार घेतले आहेत, जेथे लष्करी, शैक्षणिक, उद्योग आणि सरकारचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करू शकतात. जे नावीन्यपूर्ण मार्गाने मोलाची मदत करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नाविन्य आणि संशोधनातून प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील मंडळींनी संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे.

सिंह म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाने प्रतिभावंताना यअ कार्यात सामील करुन घेण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी योजना आखली आहे. जवानाना क्षेत्रीय अनुभव आणि इनपुट मिळावे, यासाठी “iDEX” (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवकल्पना) नावाचे व्यासपीठ तयार केले आहे. त्याद्वारे सुरक्षेचे महत्व पटेल.
ते म्हणाले की, केंद्राने आयडेक्ससाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय सरकारने ३०० स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे. एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये संशोधन आणि नवकल्पना वाढवण्यासाठी ५०० कोटीची तरतूद केली आहे.

भारतीय सैन्यासाठी अवघ्या पाच महिन्यांत उत्पादित केलेल्या एक लाख हँड ग्रेनेडचे यशस्वी उदाहरण देताना सिंह म्हणाले की, फर्मने इंडोनेशियाला जास्त किंमतीत अशाच हँड ग्रेनेडची निर्यात केली आहे. प्रत्येक हँड ग्रेनेडची भारतीय किंमत ३४०० रुपये आहे आणि कंपनीने इंडोनेशियाला ७००० रुपयांपेक्षा अधिक दराने अशाच ग्रेनेडची निर्यात केली आहे. “माझा मुद्दा असा आहे की जर आपण तंत्रज्ञानात प्रगती केली तर भारत एक महासत्ता बनू शकतो. ती एक सुपर आर्थिक शक्ती बनू शकते,” असे ते म्हणाले. सिंग यांनी कोविड संशोधन क्षेत्रात नऊ पेटंट घेण्याच्या संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक या वेळी केले.

India will become a superpower through technological advancement; Defense Minister Rajnath Singh’s confidence in Pune

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात