“मराठी मालिकां या उथळ असतात..” असं म्हणत अभिनेते किरण मानेची नवी पोस्ट व्हायरल.


विशेष प्रतिनिधी

पुणे :  अभिनेते किरण माने हे कायमच आपल्या वादग्रस्त विधानानंमुळे चर्चेत असतात. किरण माने हे बिग बॉस सीजन चार च्या माध्यमातून चर्चेत आले होते. Kiran Mane upcoming new serial.

ते त्यांच्या समाज माध्यमातून विविध विषयांवर आपली मत मांडत असतात. किरण माने आता लवकरच कलर्स मराठी वरील “सिंधुताई माझी आई गोष्ट चिंधीची ” या नव्या मालिकेतून किरण माने नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेत किरण माने नेमकी कोणती भूमिका स्वीकारणार आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहे. याच मालिकेची माहिती देताना किरण माने यांनी मराठी मालिकांबद्दल सूचक अशी पोस्ट आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिली आहे ती पोस्ट सध्या चर्चेत आहे.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात , प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेल्या विश्वास मी कधीच मोडणार नाही, आता माझी हीची कलाकृती येते आहे, ती तुमचं मनोरंजन तर करेलच पण तुमचा आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाच काहीतरी देण्याची ताकद असणारी ही कलाकृती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

मालिका उथळ असतात , सासू सून, नणंद भावजया यांच्यातला गृहकलह किंवा विवाह बाह्य संबंध या पलीकडे मालिकांना विषय नसतात. अशा तक्रारी कायम केल्या जातात आणि त्यात तथ्यही आहे .
पण आता या सगळ्या चौकटी मोडून प्रेक्षकांना एक आशयघन,अस्सल, प्रभावशाली आणि काळजाला हात घालणार असं काहीतरी देण्याचा प्रयत्न सिंधुताई माझी माय या मालिकेतून केला आहे.

Kiran Mane upcoming new serial.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात