नेहले पे देहला : INDIA 26 विरुद्ध NDA 38; INDIA चा नेता कोण??; पण NDA ला मोदींचा बुस्टर डोस!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बंगलोर मध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत बैठक घेऊन नेहले पे देहला मारला. NDA च्या बैठकीत 38 पक्ष सहभागी झाले, तर बंगलोरच्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले. विरोधकांना आपले जुने नाव “युपीए” टाकून देऊन नवे नाव INDIA अर्थात “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल अलाईन्स” धारण करावे लागले. कारण “युपीए” अर्थात “युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स” हे नाव कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून कोळसा घोटाळे पर्यंतच्या वेगवेगळ्या घोटाळ्यांशी जोडले गेले होते. विरोधकांना “यूपीए” नावाचे ओझे झाले होते. ते त्यांनी आज उतरवून टाकले. But to NDA Booster dose of Modi

NDA कडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता आहे, तर विरोधकांनी INDIA हे नवे नाव धारण केले असले तरी त्यांना अजून नेता निवडण्यात यश आलेले नाही. या INDIA कडे २६ पक्ष आहेत, तर भाजपप्रणित एनडीएच्या बैठकीला होत ३८ पक्ष हजर होते.

(INDIA VS NDA)

कोण नेमके कोणासोबत??

INDIA :

काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, जदयू, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सीपीएम, सपा, इंडियन युनियन मुस्लीम लीग, सीपीआय, आप, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (एम), राजद, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआय (एमएल), आरएलडी, एमएमके, एमडीएमके, वीसीके, आरएसपी, केएमडीके, केरळ काँग्रेस, अपना दल (कमेरावादी) आणि एआयएफबी.

NDA :

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी (पारस), लोकजनशक्ती पार्टी (चिराग पासवान), अपना दल (सोनेलाल), पलानीस्वामी, AIDMK, आरपीआय (आठवले), एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, आजसू, एमएनएफ, एनपीएफ, जेजेपी, आयपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, एजीपी, निषाद पार्टी, युपीपीएल, एआयआरएनसी, टीएमसी (तमिळ मनिला काँग्रेस), शिरोमणी अकाली दल संयुक्त, जनसेना, हम, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काँग्रेस (थॉमस), गोरखा नॅशन लिबरेशन फ्रन्ट, जनातिपथ्य राष्ट्रीय सभा, युडीपी, एचएसडीपी, जनसुराज पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी.

कोण ठरणार वरचढं NDA की INDIA?

सन २०१९ च्या लोकसभा निकालाची आकडेवारी आणि मतांची टक्केवारी पाहिल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. त्यानुसार, या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला ३५३ जागांवर विजय मिळाला होता. यांपैकी भाजपला ३७.७ % मतं मिळाली होती, तर एनडीएला एकत्रित ४५ टक्के मतदान झालं होतं. तर बिगर एनडीएतील पक्षांना ५५ % मतदान झाले होते. पण हे सर्व विखुरलेल्या अवस्थेत होते.

तर २०१९च्या निवडणुकीत काही विरोधी पक्ष एकत्रित तर काही स्वतंत्रपण लढले होते. यामध्ये काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करण्यासाठी १० % जागा कमी पडल्या होत्या. दरम्यान, सध्या INDIA या आघाडीतील पक्षांचे मिळून १५० खासदार आहेत.

दरम्यान, सध्या एनडीएमध्ये समाविष्ट झालेल्या ३८ पक्षांपैकी ६५ % पक्षांकडे एकही लोकसभेची जागा नाही. तर दुसरीकडं INDIAच्या बैठकीत समाविष्ट झालेल्या २६ पक्षांपैकी ५० % हून अधिक पक्षांकडे लोकसभेत एकही खासदार नाही. म्हणजेच जर गेल्या निवडणुकीत एनडीएला ४५ % आणि बिगर एनडीए पक्षांचे मिळून ५५ % जागा होत्या. त्यामुळं बिगर एनडीए पक्ष एकत्र येऊन लढले, तरच एनडीएपेक्षा वरचढ ठरू शकतात, असा त्यांचा दावा आहे.

But to NDA Booster dose of Modi

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*