तारक मेहता का उल्टा या मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार ?


 

विशेष प्रतिनिधी

पुणे : हिंदी मनोरंजन विश्वात 2008 पासून , प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका. सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. या मालिकेने कधीकाळी प्रसिद्धीचा उच्चांक गाठला होता . लहानांपासून मोठ्यांपर्यंत तारक मेहता ही मालिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरत होती . Taarak Mehta Ka Ooltah Chashmah popular show.

मात्र सध्या या मालिकेचा वाईट काळ सुरू आहे. अनेक कलाकार या मालिकेच्या निर्मात्यावर आणि प्रोडक्शन हाऊस बाबत तक्रारी करत आहेत. या मालिकेतील एका स्त्री कलाकारने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर मालिकेच्या सेटवरही योग्य वागणूक मिळत नसल्याचं अनेक कलाकारांनी सांगितला आहे .

हे सगळं एकीकडे सुरू असताना, 2017 पासून प्रेग्नेंसी रजा घेऊन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन अर्थातच दिशा वाकणी या मालिकेपासून दूर गेली होती.

दिशा वाकणी हिने मालिका सोडली अशा प्रकारच्या बातम्यां ही मध्यंतरीच्या काळात येत होत्या . दयाबेन आपल्या आईसोबत अहमदाबादला गेली आहे. असं चित्र मालिकेत गेल्या पाच वर्षापासून दाखवल्या जाता आहे. दया बेन परत कधी येणार हा प्रश्न प्रेक्षकांनाही सतावत होता . आता या प्रश्नाचं काही अंशी उत्तर मिळाल्याचे लक्षात येतंय . अशा आशयाच्या काही बातम्याही येतायेत. पिंकविलाच्या बातमी नुसार दिशा वाकणी यावर्षी दिवाळी पर्यंत शो मध्ये परत येऊ शकते. मात्र या बातमीवर मालिकेच्या निर्मात्याकडून कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही .

आता लवकर दिशा वाकणी या अभिनेत्रीला या मालिकेत तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या आवाजामुळे प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. गेल्या सहा वर्षापासून ती या मालिकेपासून दूर झाल्याने मालिकेच्या टीआरपी वर सुद्धा परिणाम झाल्याचे दिसून आलं.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या सध्याच्या कथानकामध्ये जेठालाल दयाबेनला खूप मिस करत असून, यावर सुंदर दयाबेन लवकरच गोकुलधाम मध्ये परत येईल अशी घोषणा करताना दिसत आहे. त्यामुळे दयाबेन खरंच मालिकेत परत येणार का या चर्चांना उधाण आलय .

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah popular show.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात