अफगणिस्थानमधील घटना पाहून कंगना रनौटने मोदी सरकारचे मानले आभार, मोदी नसतील तर उद्या ते आपणही असू


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अफगणिस्थानमधील दृश्ये पाहून अभिनेत्री कंगना रनौट हिने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू, असेही कंगनाने आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. Kangana Ranaut thanked Modi government after watching the incident in Afghanistan.

कंगनाने म्हटले आहे की, चांगलं झालं मी सीएएच्या समर्थनार्थ लढाई लढली. मी संपूर्ण जगाला वाचवू इच्छिते, पण त्यासाठी सुरुवात माझ्या घरापासून करायला हवी. मी आपल्या सरकारचे आभार मानते की, त्यांनी सीएए कायदा आणला आणि एक आशावाद दाखवला, असे कंगनाने म्हटले आहे.काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगनाने एका ब्रेकींग न्यूजचा फोटो शेअर केला आहे. आज आपण मुकाटपणे हे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकते, असे कंगनाने म्हटले आहे. ती पुढे म्हणते, सीएएमुळे सर्वच हिंदू, शीख, जैन, इसाई, बुद्धिस्ट, पारसी आणि शेजारील इस्लामिक देशांतील इतर धर्मीय नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळेल, असा आशावाद निर्माण केला. मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते.

अफगाणिस्तान हा इस्लामिक देश बनण्यापूर्वी एक हिंदू आणि बुद्धिस्ट राष्ट्र होते. पाकिस्तान हे तालिबान्यांना सांभाळते आणि अमेरिका त्यांना हत्यारं देतात हे लक्षात ठेवायला हवं. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू, असेही कंगनाने आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kangana Ranaut thanked Modi government after watching the incident in Afghanistan.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात