वृत्तसंस्था
बहादुरगड (हरियाणा) : हरियाणात सुरु आलेल्या शेतकरी आंदोलनात एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. प्रथम एका गावकऱ्याला दारू पाजली. त्यानंतर त्याला हुतात्मा दर्जा देण्यासाठी जिवंत जाळण्यात आले. In Haryana, a villager was burnt alive, incident In farmers’ agitation; to give martyr status
दिल्ली – हरियाणा येथील बहादूरगढ जवळ येथे हा प्रकार घडला आहे. बहादूरगढ परिसरातील कसार येथील गावात हा प्रकार घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुकेश (वय ४२) , असे जिवंत जाळलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कोरोनाच्या नाशासाठी बेळगावात भाजपच्या आमदाराकडून यज्ञ; होमहवनाचा पेटलेला गाडा शहरात फिरवला
तो दहा वर्षाच्या मुलीचा पिता आहे. आंदोलनात हुतात्मा दर्जा देण्यासाठी त्याच्या अंगावर तेल टाकून पेटवून दिले. त्यापूर्वी त्याला दारू पाजली होती. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे मृत्यू झाला. संदीप आणि कृष्णा यांनी हा प्रकार केला आहे. त्यांच्यावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुकेश हा गावातून फिरत आंदोलनस्थळी पोचला. तेव्हा कृष्णाने त्याला रोखले. तसेच दारू पाजली आणि अंगावर तेल टाकून पेटवून दिले. भाजल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले. पण,मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App