कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग- व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. पुण्याजवळील एका युवकाने कदमवाक वस्ती येथे एका तरुणाने कामधंदा न मिळाल्यामुळे पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. Corona lockdown destroys family, youth commits suicide by killing wife, child in Pune
प्रतिनिधी
पुणे : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग- व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. पुण्याजवळील एका युवकाने कदमवाक वस्ती येथे एका तरुणाने कामधंदा न मिळाल्यामुळे पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) आणि मुलगा शिवजेत (वय एक वर्षे, दोन महिने) या दोघांचा खून केल्यानंतर हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याने आत्महत्या केली आहे. याबाबत दर्याप्पा अर्जुंन शिंदे (रा. बक्षिहिपरगा, ता. दक्षिण सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे.
हत्येच्या प्रकरणात आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार, लूक आऊट नोटीस जारी
हनुमंत हा पत्नी व मुलासह कदमवाक वस्ती येथे राहत होता. मिळेल ती कामे करून उपजिवीका भागवत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे निर्बंध लागू आहेत. या काळात त्याला काम मिळाले नाही. या बेरोजगारीला कंटाळून त्याने रविवारी सकाळी पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च्या एका वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा कापून खून केला. स्वत: बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App