चीनचे तब्बल २१ हजार किलोचे ‘लाँग मार्च’ अखेर मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले, शास्ज्ञांनी सोडला निश्वास


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीन अवकाश स्थानक उभारत असून त्याचे कोअर मोड्यूल घेऊन ‘लाँग मार्च ५ बी’चे २९ एप्रिलला प्रक्षेपण करण्यात आले होते. पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलेल्या या प्रक्षेपकावरील नियंत्रण नंतर सुटल्याने ते वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते.Chinas long march collapsed in sea

ते कोठे कोसळणार, याबाबत जगभरातील खगोलशास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता आणि चिंता होती. अनियंत्रित झालेले चीनचे सर्वांत मोठे ‘लाँग मार्च ५-बी’ हे प्रक्षेपक अखेर मालदीव बेटांजवळ हिंदी महासागरात तुकडे होऊन कोसळले.२१ हजार किलो वजनाच्या या ‘लाँगमार्च’चा पृथ्वीकडे येतानाचा वेग ताशी तब्बल २८,००० किमी इता प्रचंड होता. तर कोसळतानाचा वेग प्रति सेकंद ८ किमी होता.

शंभर फूट लांबीच्या आणि २१ टन वजनाच्या या प्रक्षेपकाचे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना हवेशी झालेल्या घर्षणामुळे या प्रक्षेपकाचे तुकडे होऊन बराचसा भाग नष्ट झाला आणि उरलेला भाग मालदीवजवळ ७२.४७ पूर्व रेखांश आणि २.६५ उत्तर अक्षांशावर समुद्रात कोसळला.

अवकाश स्थानकासाठी कोअर मॉडेल घेऊन गेलेला प्रक्षेपक नष्ट झाला असला तरी हे कोअर मॉडेल अद्याप अवकाशातच फिरत आहे. हे १८ टन वजनाचे कोअर मॉडेलही पृथ्वीच्या वातावरणात शिरुन कोसळण्याचा अंदाज आहे.

Chinas long march collapsed in sea

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी