Molestation in Farmer Protest : हरियाणा पोलिसांनी रविवारी रात्री टिकरी बॉर्डरवरील एका 25 वर्षीय महिला कार्यकर्तीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. अनिल मलिक, अनुपसिंग, अंकुश सांगवान, जगदीश ब्रार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना मदत करण्यात दोन महिलांचाही सहभाग असल्याचेही समोर आले आहे. या सर्व आरोपींनी किसान सोशल आर्मी या नावाने टिकरी बॉर्डरवर आपला टेंट लावलेला होता. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 365, 342, 376-डी, 506, 120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Molestation in Farmer Protest, Six from Tikri border protest site booked for gang rape of activist
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणा पोलिसांनी रविवारी रात्री टिकरी बॉर्डरवरील एका 25 वर्षीय महिला कार्यकर्तीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. अनिल मलिक, अनुपसिंग, अंकुश सांगवान, जगदीश ब्रार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना मदत करण्यात दोन महिलांचाही सहभाग असल्याचेही समोर आले आहे. या सर्व आरोपींनी किसान सोशल आर्मी या नावाने टिकरी बॉर्डरवर आपला टेंट लावलेला होता. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 365, 342, 376-डी, 506, 120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, आरोपींसह शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने 1 एप्रिलला बंगालच्या हुगळी येथे बैठक घेतली. पीडित महिला जी एक कलाकार आणि डिझाइनर आहे, या आरोपींच्या संपर्कात आली. नंतर महिला कार्यकर्त्यांनी तिच्या कुटुंबीयांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सामील होण्यासाठी तयार केले. 11 एप्रिल रोजी ही महिला रेल्वेने पंजाबला येत असताना अनिल मलिकने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने कशीबशी स्वत:ची सुटका केली. 12 एप्रिल रोजी दिल्लीत आंदोलन स्थळ गाठल्यानंतर पीडित मुलीवर आरोपींसोबत टेंट शेअर करण्यासाठी दबाव आणण्यात आला.
एफआयआरनुसार, पीडित मुलीने तिच्या वडिलांना फोनवर सांगितले की आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन केले. ते तिला दबावात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या मुलीवर घडलेला हा प्रसंग समजताच तिच्या कुटुंबीयांनी शेतकरी नेत्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला, यानंतर तिचा जबाब व्हिडिओ रेकॉर्ड झाला. त्यानंतर मुलीला अन्य महिला आंदोलकांसह दुसर्या टेंटमध्ये हलविण्यात आले.
21 एप्रिल रोजी पीडित मुलीला ताप आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला कोरोनाचा संसर्ग असल्याचे कळले. दिल्लीच्या रुग्णालयात जेव्हा पीडितेचे वडील पोहोचले तेव्हा तिने सांगितले की, आरोपींनी रेल्वे आणि टेंटमध्ये तिचे लैंगिक शोषण केले. यानंतर पीडित मुलीचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने आरोपींना शिक्षेची मागणी केली. त्याच बरोबर तिने यामुळे शेतकरी आंदोलनाला कोणतीही झळ बसू नये अशीही इच्छा व्यक्त केली. तथापि, एफआयआर नोंदवायला एवढा उशीर का झाला, यावर एकही शेतकरी नेता उघडपणे बोलण्यास तयार नाही.
Molestation in Farmer Protest, Six from Tikri border protest site booked for gang rape of activist
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App