BIG BREAKING NEWS : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा केंद्र सरकारकड़ून रद्द


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादूर्भाव आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहेच. पण त्याच बरोबर त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे, असे पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्ट केले. BIG BREAKING NEWS; CBSE borad examinations of 12 th cancelled due to covid 19 pandamic

तत्पूर्वी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषयी माहिती देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. तसेच 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल. परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करत परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आली आहे.

BIG BREAKING NEWS; CBSE borad examinations of 12 th cancelled due to covid 19 pandamic

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात