चीनी व्हायरस प्रयोगशाळेत तयार केलेला : नितीन गडकरी


‘चीनी व्हायरस’ नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. आपल्याला व्हायरससोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे. हा नैसर्गिक व्हायरस नसल्याने जगण्याची कला आत्मसात करणे महत्त्वाचं आहे. हा कृत्रिम व्हायरस असून जगभरातील अनेक देश त्यावर लस शोधत आहेत, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरस हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. आपल्याला व्हायरससोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे. हा नैसर्गिक व्हायरस नसल्याने जगण्याची कला आत्मसात करणे महत्त्वाचं आहे. हा कृत्रिम व्हायरस असून जगभरातील अनेक देश त्यावर लस शोधत आहेत, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेपासून (डब्ल्यूएचओ) अनेक महत्वाच्या संस्था- संघटनांनी चीनी विषाणू हा नैसर्गिक असल्याचे सांगितले. आता मोदी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री असलेल्या गडकरी यांनी वेगळा दावा व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.

ते म्हणाले, व्हायरसचा शोध घेण्यासाठी चांगल्या कार्यपद्धतीची गरज आहे. जेणेकरुन आपण लगेच व्हायरसची ओळख पटवू शकतो. हे अनपेक्षित आहे कारण हा व्हायरस प्रयोगशाळेचा आहे, नैसर्गिक नाही.

भारतासहित अनेक देश करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भारतासहित जग, वैज्ञानिक करोनाशी लढण्यासाठी तयार आहे. उपाय सापडल्यानंतर आपण सकारात्मक आत्मविश्वास निर्माण करु शकतो. एकदा लस सापडली की समस्या राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात