नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा


वृत्तसंस्था

कोलकाता : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागली असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय हेकडी कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर डायमंड हार्बर येथे हल्ला झाल्यानंतर नड्डा – फड्डा – बड्डा – खड्डा अशी असभ्य भाषा वापरणाऱ्या ममता बॅनर्जींनी नड्डा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यावर त्यांना बरे होण्याच्या शुभेच्छा देणारे मानभावी ट्विट केले आहे. West Bengal CM Mamata Banerjee wishes 

 

“बंगालमध्ये गेल्यावर ह्ल्ले आणि बंगालबाहेर गेल्यावर शुभेच्छा”, असा ममता बॅनर्जींचा राजकीय खाक्या असल्याचे यातून स्पष्ट होते. नड्डा आणि भाजप नेते कैलास विजयवर्गीय, मुकूल रॉय यांच्या ताफ्यावर तृणमूळच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ ममतांनी चकार शब्द काढला नव्हता. उलट कोणीही उठते आणि बंगालमध्ये येते. नड्डा – बड्डा – फड्डा – खड्डा यांचे इथे काम नाही, अशा असभ्य भाषेत ममतांनी टीका केली होती. West Bengal CM Mamata Banerjee wishes  

नड्डा यांच्या दौऱ्यात राज्य सरकारने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवलेला नाही. त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते, असे पत्र बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले होते. तरीही ममतांच्या सरकारने पोलिस बंदोबस्तात वाढ केली नव्हती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी डायमंड हार्बर येथे नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.

West Bengal CM Mamata Banerjee wishes

आता जेव्हा नड्डा यांच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या आल्या त्यावेळी मानभावीपणे ममतांनी नड्डा यांना कोरोना संसर्गातून बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी म्हणे त्या प्रार्थनाही करणार आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण