विशेष प्रतिनिधी
कोलकाता : केंद्रातील मोदी सरकार विरोधात ऑल आऊट वॉर पुकारण्याच्या नादात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील संघराज्य ढाचालाच धक्का देत आहेत. किंबहुना ही संघराज्य व्यवस्थाच त्यांना मान्य नसल्याची राजकीय भूमिका घेत आहेत. mamata Banerjee challenges federal
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतरच्या घडामोडी आणि ममतांची आडमुठी भूमिका यातून ही बाब अधोरेखित झाली आहे. गड्डा, फड्डा, नड्डा ही भाषा एखाद्या गल्लीतल्या राजकीय गुंडाला शोभते ती ममतांनी वापरली. पण राजकीय भाषेच्या घसरणीपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपले नाही तर ममता सरकार फक्त बंगाल विधानसभेलाच जबाबदार असल्याची थेट राज्यघटनेच्या तत्त्वाच्या विरोधात भूमिका तृणमूळ काँग्रेसचे प्रवक्ते कल्याण बॅनर्जींनी मांडली. mamata Banerjee challenges federal
याचा अर्थ राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्रालय या घटकांना राज्य सरकार जबाबदारच नाही, असा ठळक अर्थ त्यातून ध्वनित करायचा होता. आणि नेमकी हीच कृती घटनात्मक संघराज्य व्यवस्थेला धक्का देणारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा प्रामुख्याने राज्याच्या यादीतला विषय असला तरी तो सर्वस्वी केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त नाही. राज्यघटनेचे कलम ३५२ ते ३५६ पर्यंतच्या कलमांमध्ये त्याचे तपशील मिळतात. याचा सामान्य अर्थ कायदा आणि सुव्यवस्था हा केंद्र आणि राज्य या दोन्ही घटकांच्या आखत्यातरितला आणि समन्वयाने हाताळण्याचा प्रश्न आहे.
ममतांनी आपल्या आडमुठ्या कृतीतून घटनेच्या वर उल्लेख केलेल्या कलमांनाच एक प्रकारे आव्हान दिले आहे. आणि ही कलमे देशाच्या संघराज्य व्यवस्थेसंबंधी सविस्तर भाष्य करणारी आहेत. नड्डा आणि भाजपच्या अन्य नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेची तात़डीने दखल घेऊन राज्याच्या मुख्य सचिवांना आणि पोलिस प्रमुखांना दिल्लीला पाचारण करून स्पष्टीकरण मागितले.
त्यावर ममता सरकारने बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना दिल्लीला त्यांनी पर्सनली जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. स्वतः त्यांनीच तशा आशयाचे पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना लिहून त्यांना ममता सरकारकडून मिळालेल्या आदेशाची अर्थात दिल्लीत गृह मंत्रालयात हजेरी न लावण्याची माहिती दिली.
याचाच अर्थ ममता बॅनर्जी केवळ मोदी सरकारशी राजकीय पंगा घेण्याच्याच मूडमध्ये नाहीत तर त्या आपल्या सर्व कृतींमधून त्या देशाच्या घटनात्मक संघराज्याच्या ढाचालाच आव्हान देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more