भाजपातील बंडखोरांना पुरून उरले वयोवृद्ध येडीयुरप्पा, पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे हत्तीचे बळ


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : कर्नाटकातील भाजपचे प्रभारी अरुण सिंग यांनी राज्यातील नेतृत्वबदलाचा प्रश्नच उद्‌भवत नसल्याचे सांगून येडियुरप्पाच पुढील दोन वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपणास हत्तीचे बळ मिळाले आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आता माझी जबाबदारी वाढली असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. Yedi will remain CM of Karnataka



येडियुरप्पा यांच्या वाढत्या वयाचा विचार करता आगामी काळात कर्नाटकमधील नेतृत्व बदलण्यास भाजप हायकमांड प्रयत्न करीत असल्याची चर्चा काही ठिकाणी सुरू होती. यापूर्वी भाजपने अधिकृतपणे अशा प्रकारच्या हालचालींना नकार दिला असला, तरी येडियुरप्पा विरोधक शांत बसलेले नाहीत. ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील- यत्नाळ यांच्यासारखे नेते सातत्याने त्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करीत आहेत. परंतु, सध्या तरी येडियुरप्पा यांना हायकमांडकडून दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा कर्नाटक प्रभारी म्हणाले, की उर्वरित दोन वर्षे कोणताही बदल होणार नाही आणि माझ्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे, तेव्हा शंभर टक्के माझी जबाबदारी वाढली आहे. मी आणखी प्रयत्न करेन आणि पुढील दोन वर्षे प्रामाणिकपणे काम करेन.

Yedi will remain CM of Karnataka

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात