विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘ मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी पोलिस दलामध्ये तीस वर्षे सेवा करून देखील ते आता स्वतःचा राज्याच्या पोलिस यंत्रणेवर विश्वामस नसल्याचे सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य धक्कादायक आहे. असे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांची याचिका फेटाळून लावली. Supreme court rejects demand of parambir
परमबीरसिंग यांनी स्वतःविरोधातील सर्वप्रकारची चौकशी राज्याच्या बाहेर हलविण्यात यावी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली असून तिच्यावर आज न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या सुटीकालिन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
पोलिस आयुक्तपदावरून १७ मार्च रोजी उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर यांना राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख करण्यात आले होते. यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. यामुळे देशमुखांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more